मळभ आज झाडांना पाणी देताना विभा अगदी खुषीत येऊन गात होती'एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी........ त्याला कारण ही तसेचहोते म्हणा ,लग्नानंतर तब्बल सहा वर्षांनी तिच्या ओठांवर गाण्याच्या ह्या ओळी खऱ्या अर्थाने खुलून येत होत्या.आज तिचे प्रेग्नंसी रीपोर्ट पाॅजिटीवआले होते.आणि घरात अगदी सर्वच आनंदात होते खर तर विभा आणि विहंगचा प्रेमविवाह.दोघेही एकाच ठिकाणी चांगल्या हुद्द्यावर कार्यरत होते.चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी घरात सुबत्ता होती.विहंग लाडाकोडात वाढलेला आईबाबांचा एकुलता एक मुलगा.आता एकच अपत्य म्हणजे साहजिकच आईबाबांच्या सर्व अपेक्षा त्यावर केंद्रीत असतात.लग्नाला सहा वर्षे होऊनही विभाला दिवस रहात नव्हते.डाॅक्टर,वैद्य सर्व औषधोपचार झाले पण काही गुण येत नव्हता.त्याबरोबर पूजापाठ व्रतवैकल्यही चालू होती.विभाची कुस लवकर उजवावी आणि घरात दुडदुड धावणारी चिमुकली पावले यावीतअशीओढ सर्वांनाच लागली होती.आणि आज सर्वांचीच प्रार्थना फळाला येत होती. सासूबाईंचे कोडकौतुक नौरोबाचे प्रेम.विभाला सर्व अगदी फुलाप्रमाणे जपत होते.विभाचे डोहाळे पुर...